Total Pageviews

Friday, March 14, 2014

वाट पाऊले निघालो ..

वाट पाऊले निघालो मागे चाहूल कोणाची?
मागे वळून पाहता उरे झुळूक वाऱ्याची
चालताना उडे धूळ गंध मातीस उरेना
सुटले मन मागे … बंध मनीचे सुटेना
घनराईतून शीळ, काही ओळखीच्या खुणा
सावलीस साथ माझी देह अंतरीचा उणा
चालताना मग काटा कधी रुतेल पायात

वाहे पायातून जीव दाटे आभाळ डोळ्यात

Friday, November 30, 2012

Friday, October 5, 2012

Thursday, August 23, 2012

आता न होणे प्रेम पुन्हा


आता   होणे प्रेम पुन्हा
घडणार नाही आता हा गुन्हा
विचार केला हा मनी पक्का अन ..
स्मित तुझेच मनी पुन्हा

विसरावे तुला म्हणून रोज आठवितो
आली जरी आठवण तिला परत पाठवितो
नकळत सारे घडत राहते
वेड हे सारे मी मनी साठवितो

वाटेवरी आता उमगतेवाट  ही परतीची
दाटला अंधार मागेसांज पुढे सरतेची
चालण्यास  अर्थमागे वळणेही व्यर्थ
तरीही ... आस तुझ्या प्रीतीची

Sunday, November 6, 2011

flickering hope ...

दिल को अब हमने समझा लिया है
आरजू का दिया जैसे बुझ सा गया है

पता है हमे ये दिल फिर हमसे दगा करेगा
चाहो ना चाहो ये फिर तुम्हे याद करेगा
यादों के चलते दिन ढल जाये लम्हों में लेकिन
शाम को दिल को फिर वाही दर्द सहना पड़ेगा

तेरी पर्छाईयोने हर जगह घेरा है हमे
अंधेरो में भी तेरी यादों ने ढूंढा है हमे
पहले जिस प्यार पे नाज़ करते थे हम
आज उसी दीवानगी ने तोडा है हमे

Sunday, October 16, 2011

लम्हा

हर लम्हा जीके एक लम्हा मांगती है जिंदगी
लम्होसेही तो जिंदादिल बनती है जिंदगी

हर एक लम्हा जो धडकनों को छु जाए
हर लम्हा जो दिल की आँखों में समां जाए
हर एक लम्हा जो मेरे होने का एहसास दिलाए
उसी एक लम्हे को जिले जिंदगी
लम्होसेही तो जिंदादिल बनती है जिंदगी

हर लम्हा जो मेरे लिए रुकता है
हर एक लम्हा जो मुझसे ये कहता है
लम्हों के लहरों पे क्यों तनहा बहता है
लम्हा जो बिता फिर न पाएगा जिंदगी
लम्होसेही तो जिंदादिल बनती है जिंदगी

Tuesday, October 11, 2011

समजूत मनाची

मी विचारतो मनाला नेहमीच असे का घडावे?
तुटणारे स्वप्न रोज मनु तुलाच का पडावे?
      तुलाच आस होती ना नभी मुक्त उडण्याची
      मग आता का भीती पुन्हा उरी परतण्याची
थोडे क्षण उन्हाचे अन फुलासोबत काटा
काही थेंब पावसाचे येती सगळ्यांच्या वाटा
     धीर तुला मान्य नाही अन व्यक्तही तू होत नाही
     भावना अधीर काळजातल्या शब्दही तू होत नाही
एकदाच श्वास रोखून पाहावे तिच्या डोळ्यात
गुज सारे कळावे तिला थांबलेल्या क्षणात