Total Pageviews

Tuesday, October 11, 2011

समजूत मनाची

मी विचारतो मनाला नेहमीच असे का घडावे?
तुटणारे स्वप्न रोज मनु तुलाच का पडावे?
      तुलाच आस होती ना नभी मुक्त उडण्याची
      मग आता का भीती पुन्हा उरी परतण्याची
थोडे क्षण उन्हाचे अन फुलासोबत काटा
काही थेंब पावसाचे येती सगळ्यांच्या वाटा
     धीर तुला मान्य नाही अन व्यक्तही तू होत नाही
     भावना अधीर काळजातल्या शब्दही तू होत नाही
एकदाच श्वास रोखून पाहावे तिच्या डोळ्यात
गुज सारे कळावे तिला थांबलेल्या क्षणात

No comments:

Post a Comment