Total Pageviews

Friday, March 14, 2014

वाट पाऊले निघालो ..

वाट पाऊले निघालो मागे चाहूल कोणाची?
मागे वळून पाहता उरे झुळूक वाऱ्याची
चालताना उडे धूळ गंध मातीस उरेना
सुटले मन मागे … बंध मनीचे सुटेना
घनराईतून शीळ, काही ओळखीच्या खुणा
सावलीस साथ माझी देह अंतरीचा उणा
चालताना मग काटा कधी रुतेल पायात

वाहे पायातून जीव दाटे आभाळ डोळ्यात

No comments:

Post a Comment