Total Pageviews

Thursday, August 4, 2011

सरलेल्या सरी

काय गम्मत असतेना पाऊसाची
पाऊस तोच ... तसाच समुद्र उधाणलेला
तीच पाऊसाची रिमझिम ... तसाच गारवा मंतरलेला
सर्वकाही तसच ... पण या पाऊसाला काही त्या सरींची सर नाही .....

हळूच मन उठून उभं रहात
सागराच्या पाण्यात ... पावसाला विरघळताना पाहत रहात
मला म्हणत ... चलना पुन्हा ... आठवणी काही करती खुणा
सर्वकाही तसच ... पण या पाऊसाला काही त्या सरींची सर नाही .....

सरता सरता संध्याकाळ सरून जाते
पाऊस काही सरत नाही ...
तू म्हणायची ना जसे ... इतका वेळ भेटूनही ... माझं मन काही भरत नाही ...
सर्वकाही तसच ... पण या पाऊसाला काही त्या सरींची सर नाही .....

परतीच्या वाटेवर पाऊस पुन्हा सोबतीला
भिजलेले मन ... थिजलेले डोळे ...
सरलेले क्षण ... मनातील सल ...
सर्वकाही तसच ... पण या पाऊसाला काही त्या सरींची सर नाही .....

No comments:

Post a Comment